पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांचे सादरीकरण सोमवारी (दि.६) बैठकीत करण्यात आले. यावेळी महापालिकेचे नवीन मुख्यालय, कळंबोली येथील फिश व मटण मार्केट प्रकल्प तसेच शिलार प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती सादर करण्यात आली.
या आढावा बैठकीला महापौर नितीन पाटील, माजी सभागृहनेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर, आयुक्त मंगेश चितळे उपस्थित होते. उपस्थित लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या तांत्रिक, व्यावहारिक बाजू समजून घेत कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.
या बैठकीस सभागृहनेते ॲड. प्रकाश बिनेदार, नगरसेवक मनोज भुजबळ, सुमित झुंजारराव, दशरथ म्हात्रे, विकास घरत, नगरसेविका अस्मिता घरत, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
Check Also
अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती
भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …
RamPrahar – The Panvel Daily Paper