पनवेल : प्रतिनिधी
दक्षिण कोरियात होणार्या जागतिक तायक्वांडो पुमसे स्पर्धेसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटना व इंडिया तायक्वांडो यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुल येथे निवड चाचणी घेण्यात आली. यामध्ये रायगड व नवी मुंबईची आंतरराष्ट्रीय तायक्वांडो खेळाडू प्राजक्ता अंकोलेकर हिने सहभाग घेत उत्कृष्ट प्रदर्शन केले. यामुळे तिची जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
स्पर्धेच्या पूर्व तयारीसाठी 25 दिवसांचे सराव शिबिर सुरू आहे. या शिबिरात प्रशिक्षण घेऊन प्राजक्ता 21 ते 24 एप्रिलदरम्यान होणार्या 12 व्या पुमसे वर्ल्ड तायक्वांडो स्पर्धेसाठी दक्षिण कोरियातील गोयंका येथे जाणार आहे, प्राजक्ता गेली 20 ते 25 वर्षे तायक्वांडोचे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय पंच व सातवी डिग्री ब्लॅक बेल्टधारक सुभाष पाटील यांच्याकडे घेत असून तिने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून सुवर्णपदके जिंकली आहेत.
भारतीय संघात निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव व इंडिया तायक्वांडोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांनी प्राजक्ताचे विशेष अभिनंदन केले आणि तिला जागतिक तायक्वांडो स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. प्राजक्ताचे रायगड तसेच नवी मुंबईतून कौतुक होत आहे.
Check Also
पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …