पनवेल : रामप्रहर वृत्त
करंजाडे डॉक्टर्स असोिएशनतर्फे डॉक्टर फ्रेंण्डशीप कप क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. प्रमोद गांधी यांच्या हस्ते, तर बक्षीस वितरण पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉ अरुणकुमार भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या क्रिकेट स्पर्धेत पेण यंगिस्थान संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेत तळोजा टायगर क्रिकेट संघाने द्वितीय, खांदा कॉलनी सुपरकिंग संघाने तृतीय आणि करंजाडे लायन्स संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला तसेच डॉ. सचिन नाईक यांना सामनावीर, डॉ. तुषार कांबळे यांना उत्कृष्ट फलंदाज, डॉ. तुषार कांबळे यांना उत्कृष्ट फलंदाज, डॉ. अभिजीत पाटील यांना उत्कृष्ट गोलंदाज, डॉ. आशीष करावकर यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व डॉ. अभिजीत भोईर यांना उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले.
या वेळी डॉ. संतोष जाधव, विनोद साबळे, सरपंच रामेश्वर आंग्रे, प्राचार्य गणेश ठाकूर, डॉ. आशीष गांधी, डॉ. कारंडे, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. उमेश अमृतकर, डॉ. सतीश भोईर, डॉ. आनंद गोखले, डॉ. शिरीष जोशी, डॉ. इंदर चव्हाण, डॉ. पांढरे, डॉ. पराडकर, डॉ. पाटील, डॉ. सचिन पवार आदी उपस्थित होते.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …