Breaking News

नवीन पॅन कार्ड, आयुष्मान, आधार कार्ड शिबिर उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त
ग्रुप ग्रामपंचायत वांगणी तर्फे वाजे माजी उपसरपंच अक्षता म्हात्रे यांच्या संयुक्त विद्यमाने आधार, पॅन कार्ड मोफत शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन मोहोगाव येथे करण्यात आले होते. या वेळी या शिबिराला पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शनिवारी (दि. 10) भेट दिली.
या वेळी या शिबिरामध्ये नवीन पॅन कार्ड, आयुष्मान, आभा कार्ड, आधार कार्ड तयार करणे, आधार कार्डवर दुरुस्ती तसेच आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करता येईल यांसारख्या सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या वेळी शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, सुकापूर सरपंच राजेश पाटील, सरपंच अशोक पवार, उपसरपंच अरुण जले, जिल्हा परिषद माजी सदस्य तथा तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी सदस्य अमित जाधव, माजी उपसरपंच प्रमोद म्हात्रे, रामदास पाटील, चाहू म्हात्रे, संतोष शेळके, अनंता पाटील, गुरुनाथ भोईर, संतोष पाटील, हभप लक्ष्मण महाराज, हभप पुंडलिक पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply