Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील सर्वोत्तम विद्वान -संजीव नाईक

नवी मुंबई ः प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्वोत्तम विद्वान व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळेच आपण भारतीय बाबासाहेब यांना युगपुरुष म्हणून संबोधित करतो. समता, स्वतंत्र आणि बंधुत्व यावर आधारित त्यांनी लिहलेल्या आदर्श राज्यघटनेमुळेच आजही आपण एकसंघ आहोत, असे प्रतिपादन माजी खासदार संजीव नाईक यांनी नेरुळमध्ये बोलताना सांगितले. नेरुळ सेक्टर 6 सारसोले गावमधील पंचशील सामाजिक संस्थेच्या विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भीम अनुयायांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. या उत्सवाला भाजप नेते माजी खासदार संजीव नाईक, स्थानिक माजी नगरसेवक सुरज पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी नाईक बोलत होते. प्रारंभी, पंचशील ध्वजारोहण, धम्मपूजा करण्यात आली. प्रसिद्ध गायक भीमराव तायडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या जयंतीमहोत्सवात आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply