कर्जत : बातमीदार
तालुक्यातील शेवटचे टोक असणारी व दुर्गम भागातील संपूर्ण आदिवासी भाग असणारी झुगरे वाडी ही 100 घरांची वस्ती आहे. या शाळेत शिकणार्या मुलांना सर्व प्रकारच्या प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षक महाराष्ट्र अर्थात एटीएम समूह सदस्य रवी काजळे हे विक्रम अडसूळ यांचे आणि आएओइ मास्टर माईंड मुंबई या संस्थेच्या माध्यमातून हे साहित्य देण्यात आले. मुंबईतील दीपक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स अर्थात (आएआएओइ)या संस्थेचे देशभर जाळे आहे. या संस्थेचे मुंबईतील सभासद शिवाजी वामन, सुरेश जठार,चंद्रशेखर सकपाळ, अनिल चव्हाण,राजेश चव्हाण,हेनरी लोबो यांनी झुगरे वाडी येथे येऊन पुस्तके डिजिटल संच आणि वाघ्याच्या वाडी आणि झुगरेवाडी शाळेसाठी पंखे डिजिटल संच दिले. झुगरेवाडीसारख्या दुर्गम भागात ही मदत दिल्याबद्दल झुगरेवाडी शाळेचे मुख्याध्यापक रवी काजळे यांनी संस्थेच्या माध्यमातून आभार मानले. यापुढेही मदत केली जाईल, असे आश्वासन सुरेश जठार यांनी दिले. शिवाजी वामन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र संचालक, निलेश कोकाटे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास पोलीस पाटील जनार्धन पारधी, आनंद कराळे,संतोष कोरडे, सतीश घावट, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.