पनवेल ः वार्ताहर
हजारो विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि आयआयटीयन बनण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्यात मदत करण्यासाठी आकाश व बायजुस यांचे संयुक्तिक केंद्र खारघर शहरात सुरू केले आहे.
खारघर येथील नवीन केंद्रामध्ये 320विद्यार्थ्यांसाठी चार प्रशस्त वर्ग असणार आहेत. या क्लासरूम सेंटरचे उद्घाटन आकाश बायजूसचे प्रादेशिक संचालक अमितसिंग राठोड आणि कंपनीच्या इतर अधिकार्यांच्या हस्ते करण्यात आले. व्यवस्थापकीय संचालक आकाश चौधरी म्हणाले, खारघरमधील हे नवीन केंद्र विद्यार्थांना ऑलिम्पियाड्सचा टप्पा पार करण्यासाठी तसेच डॉक्टर आणि आयआयटीयन बनण्याची तयारी करणार्या स्थानिक विद्यार्थ्यांसाठी एक मोठे वरदान ठरेल. आकाश- बायजुस येथे दिले जाणारे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी व्यापक बनवितात. आकाश -बायजूस येथील तज्ज्ञ प्राध्यापक आधुनिक आणि परस्परसंवादी शिक्षण पद्धतींचा अवलंब करतात ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे ध्येय साध्य करण्यात मदत होते.