कर्जत : बातमीदार
महेश भगत फाउंडेशनने कर्जत तालुक्यातील भुतीवलीवाडीमधील आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळ तयार करण्यासाठी लागणार्या किराणा सामनाचे वाटप केले. या वाडीमधील 12 आदिवासी लोकांच्या घरात या वर्षी पुराचे पाणी शिरले होते, त्यामुळे त्यांच्या घरातील धान्य खराब झाले होते. येथील आदिवासी बांधवांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी फाउंडेशनकडून ही मदत वाटप करण्यात आली. या फाउंडेशनकडून गेल्या अनेक वर्षापासून दिवाळी फराळ तयार करण्यासाठी लागणार्या किराणा सामनाचे वाटप करण्यात येत आहे. या वर्षी भुतीवलीवाडीमधील आदिवासींना दिवाळी फराळ बनविण्यासाठी लागणारे रवा, साखर, मैदा, डालडा, गूळ आदी किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यासाठी फाउंडेशनला नेरळचे व्यापारी अम्रेश शहा यांचे विशेष सहकार्य मिळाले. फाउंडेशनेचे अध्यक्ष महेश भगत, उपाध्यक्ष नरेश शेळके, आसल ग्रामपंचायतीचे सदस्य रूपेश कोंडे, भाऊ ठाकरे, फाउंडेशनचे सदस्य भरत मुकणे, सुधीर भगत, प्रदीप मसणे, किरण केवणे, दिनेश शिंदे, दुंदा गायकवाड, अशोक भगत याच्यासह ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.