Breaking News

एर्नाकुलम एक्सप्रेसमधून दागिने, मोबाईलची चोरी

रोहे ः प्रतिनिधी 

कोकण रेल्वे मार्गावरील  एर्नाकुलम एक्सप्रेस या गाडीतून प्रवास करणार्‍या दोन महिला प्रवाशांचे सोन्याचे दागीने व मोबाईल असा एकूण 86हजार रूपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेस (नंबर 22149) या गाडीतून ठाणे येथील अश्लेषा कांबळे व रंजना नायर या दोन महिला प्रवास करीत होत्या. ही गाडी 27 मार्च रोजी कोलाड (ता. रोहा) रेल्वे स्थानकातून रवाना होत असताना अज्ञात चोरट्याने अश्लेषा कांबळे यांचे 55हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याचे झुमक्यांचे जोडे, एक सॅमसंगचा मोबाईल तसेच याच डब्यातून प्रवास करणार्‍या रंजना नायर यांचा मोबाईल, सोन्याचे दागीने  असा एकूण 86हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हवालदार एन. जी. पवार करीत आहेत.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply