Breaking News

कामोठ्यात सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते पथदिव्यांचे उद्घाटन

हेमलता म्हात्रे यांच्या नगरसेवक निधीतून सुविधा

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘क’च्या माजी सभापती आणि विद्यमान नगरसेविका हेमलता म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रभागात विकासाची अनेक कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत त्यांच्या नगरसेवक निधीमधून पथदिवे उभारण्यात आले आहेत. या पथदिव्यांचे उद्घाटन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 27) झाले.
कार्यतत्पर नगरसेविका हेमलता म्हात्रे यांच्या नगरसेवक निधीतून श्री समर्थ बैठक हॉलजवळ, जिंदाल रेसिडेन्सी आणि पोलीस ठाणे येथील मुनोत रेसिडेन्सीसमोरील रस्त्यावर पथदिवे उभारण्यात आले आहेत. या पथदिव्यांच्या उदघाटन समारंभास भाजप प्रभाग 14चे अध्यक्ष गणेश म्हात्रे, युवा मोर्चा पनवेल शहर उपाध्यक्ष आकाश डोंगरे, प्रभाग उपाध्यक्ष शावेज रिजवी, उज्ज्वला पाटील, भारती पाटील, हेमंत म्हात्रे, हर्षल म्हात्रे, अविनाश पाटील, भावेश गायकर, जोशी, रमेश पाटील यांच्यासह रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नगरसेविका हेमलता म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रभागात सुरू असलेल्या विकासकामांबद्दल त्यांचे कौतुक केले.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply