Saturday , December 3 2022

व्हॉलिबॉल स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल विजयी

उरण : वार्ताहर
जिल्हा क्रीडा परिषद अलिबाग आणि पंचायत समिती उरण  यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 19) युईएसच्या भव्य पटांगणात तालुकास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 14 वर्षांखालील व 17 वर्षांखालील मुलांच्या गटात रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल विजयी ठरले, तर यु.ई.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज उपविजयी ठरले.
युईएस संस्थेचे  माजी अध्यक्ष व सदस्य अ‍ॅड. राजेंद्र भानुशाली यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यांच्यासोबत उरण तालुका समन्वयक मनोहर टेमकर, सिनियर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या सोनाली म्हात्रे, स्कूल व ज्यु.कॉलेजच्या प्राचार्या सिमरन दहिया, सिनियर कॉलेजच्या एचओडी, पूर्व-प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागातील सुपरवायझर्स, तसेच एक डॉक्टर व एक सहाय्यक, सर्व शाळेतील स्पर्धक आणि त्यांचे क्रीडा प्रशिक्षक उपस्थित होते.

Check Also

राजिपकडून जनतेला मिळणार महत्त्वपूर्ण ऑनलाइन सुविधा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद (राजिप) प्रशासनाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या कशा सुविधा …

Leave a Reply