नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांचा जाहीर पाठिंबा
उरण ः बातमीदार
महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी /संवर्ग कर्मचारी संघटनेच्या अनेक मागण्या शासन दरबारी मान्य होत नसल्याने संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांनी अर्थातच शासकीय कर्मचार्यांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 1 मे रोजी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या कामबंद आंदोलनाला भाजपच्या उरण नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांनी जाहीर पाठिंबा दिला. आपण कामगारांसोबत असल्याचे सांगत कामगारांच्या सर्व मागण्या प्रशासनाने मान्य कराव्यात, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.
उरण नगर परिषद स्थानिक संघटनेचे अध्यक्ष संतोष तेलंगे, उपाध्यक्ष मिलिंद जाधव, संतोष गुडेकर, सचिव संजय पवार, सहसचिव आकाश कवडे, खजिनदार संजय दाते, सहखजिनदार रमेश सरवदे, कार्याध्यक्ष नितीन कासारे, सह कार्याध्यक्ष नितीन कांबरे, संघटक अनिल जगधणी, झुंबर माने, महिला संघटक सुलोचना हलसे, देवयानी गोडे, मनीषा उमते, भारती करंगुटकर, रशिदा शेख, कांचन तारेकर, सल्लागार झुंबर माने, राजेश कदम, संजय डापसे यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.