सीकेटी महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त
कष्टकर्यांचे द्रष्टे नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांची शनिवारी (दि. 7) 34वी पुण्यतिथी आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने सकाळी 11.30 वाजता खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
जनार्दन भगतसाहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट आहे. त्यांनी अहोरात्र जनतेची सेवा केली. फक्त राजकारण नाही, तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. आयुष्यापेक्षा ध्येय मोठे असले पाहिजे, अशी शिकवण त्यांनी समाजामध्ये रूजवली. त्यांच्या नावाने व आशीर्वादाने सुरू झालेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने दरवर्षी पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित केला जातो. त्या अनुषंगाने शनिवारी होणार्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर असणार आहेत.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, कार्यकारी मंडळ सदस्य नगरसेवक अनिल भगत, प्रकाश भगत, हरिश्चंद्र पाटील, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, कार्यकारी मंडळ सदस्य संजय भगत, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, वसंत पाटील, संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.