आमदार प्रशांत ठाकूर यांचा उत्स्फूर्त सहभाग
पनवेल : रामप्रहर वृत्त
धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करंजाडे येथे शनिवारी (दि. 14) मराठा स्वराज्य सामाजिक संस्थेच्या वतीने पालखी काढून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तेथे भेट देत पालखीचे भोई झाले.
या कार्यक्रमास मराठा स्वराज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद साबळे, शशिकांत मोरे, प्रथमेश पुंडे, अतिश साबळे, रोहित म्हामळे, राजू नलावडे, वैशाली जगदाळे, संगीता पवार, बळीराम म्हात्रे, मिरेंद्र शहरे, सुरज शेलार आदी उपस्थित होते.