Breaking News

खारघरमध्ये रक्तदान, आरोग्य शिबिराला प्रतिसाद

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती

खारघर : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि. 12) खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरास लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
अटल फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ खारघर एक्झिक्युटिव्ह, रुधिर सेतू संस्था, एमजीएम हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल आणि खारघर भाजप यांच्या सहकार्याने झालेल्या शिबिरात 92 जणांनी रक्तदान केले तसेच या वेळी अनेक नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी झाली. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ब्रिजेश पटेल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
या शिबिराला भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, नगरसेवक अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, रामजी बेरा,  सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, माधुरी श्रीनिवास कोडूरू, जिल्हा चिटणीस गीता चौधरी, मोना अडवाणी, बिना गोगरी, संध्या शारबिद्रे, साधना पवार, शोभा मिश्रा, अंजुबेन पटेल, निर्मला यादव, प्रिया दळवी, सुनंदा देसाई, विजया लक्ष्मी सरकार, वासुदेव पाटील, समीर कदम, संदीप रेड्डी, किरण पाटील, प्रभाकर बांगर, विलास आळेकर, गिरीश गुप्ता, राजेंद्र मांजरेकर, सूर्या दुडम, शुभ पाटील, नवनीत मारू, संतोष शर्मा, मुकेश गर्ग, सुमित सहाय, योगेंद्र कोत्यारि, रोहन शेट्टी, कृष्णा खडगी, अशोक जांगीड, विजय बागडे आदी उपस्थित होते. शिवाय अनामिका चप्पल आणि काजल कांबळे या मिसेस खारघर विजेत्या दोघींनीही या शिबिराला सदिच्छा भेट दिली.
राष्ट्रीय हित जोपासत सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने जास्तीत जास्त जणांनी रक्तदान करण्याचे आवाहन अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी केले होते. त्यास प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. या वेळी पटेल म्हणाले की, रक्तदान ही काळाची गरज आहे. एका रक्तदात्यामुळे आपण तिघांचे प्राण वाचवू शकतो ही कल्पनाच अतिशय सुखावह ठरते.

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply