Breaking News

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळतर्फे पनवेलमध्ये योग दिन

पनवेल : रामप्रहर वृत्त

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पनवेल हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात योग दिन साजरा केला.

या वेळी बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल शाखेचे विशेष सहाय्यक व गुणवंत कामगार अरविंद मोरे, शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. नीलिमा अरविंद मोरे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पनवेल केंद्राचे प्रमुख प्रवीण सकट, योग साधना केंद्र, पनवेलचे संस्थापक, शिरीष पाथरे, ग्रेसफुल हॅन्ड ट्रस्टच्या अध्यक्ष पायल मधोक व बालग्रामचे अधीक्षक डॉ विनायक पाटील उपस्थित होते.

या वेळी अरविंद मोरे म्हणाले की, प्रत्येक नागरिकांना योगाचे महत्व जाणून घेण्यासाठी व काही प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी आज कामगार कल्याण मंडळ, योग साधना केंद्र, ग्रेसफुल हॅन्ड ट्रस्ट व बालग्राम, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ते पुढे म्हणाले की, आजचे युग हे स्पर्धेचे व तणावाचे आहे. ह्या तणावावर मात करण्यासाठी योग हा एक योग्य पर्याय आहे. आपले सर्वांचे स्वास्थ चांगले राहण्यासाठी योग करणे फायद्याचे आहे. म्हणून जास्तीत जास्त लोक योगा कडे वळत आहेत ही चांगली बाब आहे. त्यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे योग दिनानिमित्त आयोजन केल्याबद्दल आभार मानले.

या वेळी पायल मधोक यांनी सुद्धा आपले विचार मांडले. तसेच शिरीष पाथरे, संस्थापक, योग साधना केंद्र, पनवेल यांनी योगाची सविस्तर माहिती देऊन प्रात्यक्षिके सुद्धा करून दाखविली. त्याला उपस्थितांनी सुद्धा मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

योग प्रशिक्षीका सुभद्रा घोगरे, संगीता होतकर, संचालिका प्रज्ञा पाथरे, संध्या सिन्हा, लता कोरियन, सुरेखा पंडित, पूनम विनायक पाटील, जयश्री, प्राजक्ता आदी या वेळी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रवीण सकट यांनी मानले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply