पनवेल : वार्ताहर
को.ए.सो. इंदुबाई वाजेकर इंग्रजी माध्यम शाळेत दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांनाच सत्कार समारंभ झाला. या कार्यक्रमाला शाळा समितीने चेअरमन व्ही. सी. म्हात्रे, शाळा समिती सदस्य नंदकुमार वाजेकर, अंजली उर्हेकर, देशपांडे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मानसी कोकीळ उपस्थित होत्या.
सृष्टी विनोद ठाकूर हिने 481/ 500 गुणांसह प्रथम क्रमांक, गायत्री विनोद मुकादमे 479/500 गुणांसह तृतीय क्रमांक संपादन केला. शाळेचा एकूण निकाल 988 टक्के लागला. 70 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य संपादन केले. कार्यक्रमाचे प्रस्तविक मुख्याध्यपिका मनीषा पाटील यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच एक माणूस म्हणून चांगले जीवन जगावे असा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करताना सालेने शैक्षणिक विकासाबरोबरच सर्वांगीण विकास केला असे मत व्यक्त केले.
शाळा समितीचे चेअरमन व्ही. सी. म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुम्ही जिद्द ठेवा आणि उज्वल यश संपादन करा, असा संदेश दिला. या वेळी शाळेच्या गुणवान विद्यार्थ्यांनी वैखरी पोटे आणि नित्या पाटील यांनी गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय भरतनाट्यम स्पर्धेत वैयक्तिक प्रथम क्रमांक, समूहनृत्य द्वितीय क्रमांक संपादन केल्याबद्दल, त्यांचाही सत्कार करण्यात आला. या कर्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती शिंदे आणि आभार प्रदर्शन श्रीमती आजमा शिरगावकर यांनी केले.