Breaking News

अपघात करून पळून जाणार्या ट्रकचालकांना अटक

पनवेल ः वार्ताहर

मुंबई- पुणे हायवेवर कोन येथे ट्रकने मोटरसायकलला धडक देऊन 19 वर्षीय आयरीन सुसान जोसेफ (रा. इंडियाबुल सोसायटी कोन) या तरुणीचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संजय रामचंद्र जाधव (वय 44, साठेनगर, घाटकोपर), बालकुशीन जयराम कुमार (25 वर्ष सॉल्ट पॅन्ट रोड, वडाळा) अशी आरोपींची नावे आहेत.

गोवर्धन गोपी (वय 22) हा आयरीन सुसान जोसेफ असे दोघे दुचाकी (क्र. एमएच 43 एई 6995) घेऊन कोन गावच्या दिशेने जात होते. या वेळी पाठीमागून येणार्‍या एका ट्रकचालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात आयरीन खाली पडून जखमी झाली. त्यानंतर दुसर्‍या ट्रकने पुन्हा तिला धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर दोन्ही ट्रकचालक पळून गेले होते. या गुन्ह्याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पनवेल तालुका पोलिसांसमोर होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे यांच्या पथकाने तपास करण्यास सुरुवात केली. पथकाने घटनास्थळी भेट देऊन आसपासचे सीसीटीव्ही तपासले असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन मोठ्या ट्रकनी दुचाकीला ठोकर मारून पळून गेल्याचे दिसून आले.

दोन्ही ट्रकवर काही सांकेतिक निशाणी असल्याचे दिसून आल्याने सांकेतिक निशाणीचा अंदाज बांधून दोन्ही ट्रकचे क्रमांक व मूळ मालकाचे नाव निष्पन्न केले. त्यानंतर दोन्ही ट्रकचालकांना ताब्यात घेतले असता त्यांनी चौकशीअंती गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली.

हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी कोणताही दुवा नसताना फक्त सीसीटीव्हीच्या आधारे वेळेचे गणित जुळून अतिशय कौशल्याने सदरचा गुन्हा गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि संजय गळवे व डीबी पथकाने अहोरात्र मेहनत घेऊन गुन्हा उघडकीस आणलेला आहे. अधिक तपास सपोनि संजय गळवे करीत आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply