Breaking News

कुत्र्यांना विष देऊन मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पनवेल : बातमीदार

तालुक्यातील आकूर्लि येथे कुत्र्यांना विष देऊन मारल्या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकुर्ली येथील दिनेश भोपी हे घराचे आजुबाजुच्या परिसरामध्ये फिरणार्‍या एक लाल रंगाचा व दुसरा सफेद रंगाच्या कुत्र्याला रोज खावु देत असत. 21 जून रोजी त्यांना घराच्या समोर एक लाल रंगाचा व दुसरा सफेद रंगाचा कुत्रा रस्त्यावर निपचीत पडलेला दिसला. या वेळी दिनेश भोपी याने कुत्र्यांच्या जवळ जावुन बघितले असता दोन्ही कुत्र्यांच्या तोंडातुन फेस व रक्त येवुन मरण पावले असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे कुणीतरी या दोन्ही कुत्र्यांना कशाच्या तरी सहाय्याने विष देवुन जीवे मारले असल्याने भोपी यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply