Breaking News

चुकीच्या धोरणांमुळे सहकारी बँका अडचणीत येतात -सतीश मराठे

जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघाच्या अलिबाग कार्यालयाचे उद्घाटन

अलिबाग : प्रतिनिधी

ढिसाळ व्यवस्थापन, चुकीची धोरणे, व्याजदर ठरवण्यातील समस्या, मार्केटींगकडे दुर्लक्ष यामुळे  सहकारी बँका व पतसंस्था  अडचणीत येतात, असे मत रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी अलिबाग येथे व्यक्त केले.

रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघाचे अलिबाग येथे स्वमालकीचे  नवीन कार्यालय घेण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटन सभारंभात अध्यक्षस्थानावरून सतीश मराठे बोलत होते. सहकारी बँका व पतसंस्थांनी व्याजदर निश्चीत करणे ही काळाची गरज आहे, त्यांनी या वेळी सांगितले.

रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांच्या महासंघाचे स्वतःच्या मालकीचे कार्यालय झाल्यामुळे त्यांची प्रतिमा उंचावणार आहे. काम अधिक वेगाने होईल, असा विश्वास राज्य पतसंस्थांचा महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी व्यक्त केला.

पतसंस्थांना शासनाकडून काही मिळवायचे असेल,  त्यासाठी लढायचे असेल तर सहकारी पतसंस्थांनी संघटीत राहिले पाहिजे, असे सहकार भारतीचे राष्ट्रीय महासचिव डॉ. उदय जोशी म्हणाले.

रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांच्या महासंघाचे उत्पन्न कमी होत असल्यामुळे भाडे भरणे परवडत नाही. त्यामुळे महासंघाचे स्वतःच्या मालकीचे कार्यालय असणे गरजेचे होते, असे संचालक सुरेश पाटील यांनी सांगितले.

सहकारी पतसंस्थांच्या महासंघाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. जे. टी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. अमित ओझे यांनी सुत्रसंचालन केले. दिलीप जोशी यांनी सहकार गीत सादर केले. सचिव योगेश मगर यांनी आभार मानले.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply