Breaking News

माणगावच्या काळ नदीपुलावर खड्डेच खड्डे

माणगाव : प्रतिनिधी

सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे काळ नदीवरील माणगाव येथील पूलावर जागोजागी खड्डे पडले असून, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.

माणगावमधील काळ नदीचा पूल मुंबई-गोवा महामार्गावर असून, दिवसांतून हजारो वाहने या पुलावरून ये-जा करीत असतात. पुलावर पडलेल्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचत असल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे या खड्ड्यांत वाहने जोरात आदळतात. सध्या मुसळधार पाऊस पडत असल्याने रात्रीच्या वेळी या खड्ड्यांत वाहने जोरात  आपटत आहेत. मंगळवारी (दि. 12) रात्री माणगावमधील काळनदी पुलावर पडलेल्या एका मोठ्या खड्ड्यात दुचाकी आदळल्याने दुचाकीस्वाराच्या पाठीमागे बसलेली महिला खाली पडली. सुदैवाने ही दुचाकी हळू जात असल्याने या महिलेला किरकोळ दुखापत झाली. या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष देऊन हे खड्डे चांगल्या प्रकारे तातडीने बुजवावेत, अशी मागणी  नागरिकांनी केली आहे.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply