नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
वाशी गावातील एका अल्पवयीन मुलीसोबत 20 ते 25 वयोगटातील एका अज्ञात तरुणाने अश्लील चाळे केल्याची घटना रविवारी (दि. 24) दुपारी घडली होती. या प्रकरणी विनयभंगासह पोस्को कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात तरुणाचा शोध घेत आहेत.
पीडित मुलगी रविवारी दुपारी 2 च्या सुमारास दुकानातून दूध आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. या वेळी 20 ते 25 वयोगटातील एका अज्ञात तरुणाने पीडिताला बोलावून घेऊन बाजूच्या इमारतीमध्ये नेले. त्यानंतर त्याने पीडितेसोबत अश्लील चाळे केले होते. या प्रकारानंतर घाबरलेल्या पीडित मुलीने घडल्या प्रकाराची माहिती आई-वडिलांना दिली. त्यांनी त्या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सापडला नसल्याने अखेर पीडित मुलीच्या पालकांनी वाशी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.