पनवेल ः रामप्रहर वृत्त
दिवाळीनंतर रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून, बुधवारी (दि. 25) नवे 166 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 115 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 119 व ग्रामीण 21) तालुक्यातील 140, अलिबाग नऊ, पेण सात, कर्जत तीन, महाड दोन आणि खालापूर, माणगाव, सुधागड व श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल तालुक्यातील आहे. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 56,563 आणि मृतांची संख्या 1601 झाली आहे. 53,906 जण कोरोनामुक्त झाल्याने 1056 सक्रिय रुग्ण आहेत.
Check Also
सीकेटी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) …