खारघर ः रामप्रहर वृत्त
पनवेल येथील कर्नाळा क्रीडा अकादमीत झालेल्या जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन 17 वर्षाखालील वयोगटात व्दितीय क्रमांक पटकाविला. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी विद्यार्थिनींचे विशेष कौतुक व अभिनंदन केले तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.