Breaking News

मालमत्ता कराची वसुलीमध्ये भरघोस वाढ

नागरिकांचा कर भरण्याकडे ओढा
पनवेल ः वार्ताहर
पनवेल महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेने सिडको हस्तांतरीत भाग, एमआयडीसी भागांमध्ये व्यावसायिक मालमत्ता करधारकांडून वसुलीची थेट कारवाई सुरु केली आहे. परिणामी मालमत्ता करांमध्ये भरघोस वाढ होताना दिसत आहे. आत्तापर्यंत एकूण मालमत्ता कर 220 कोटी जमा झाला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था जसे महानगरपालिका महत्त्वाच्या सेवा नागरिकांना पुरवित असते. यामध्ये पाणी पुरवठा, रस्ते, त्यांची देखभाल, ड्रेनेज, परिसराची स्वच्छता, उद्याने, विविध नागरी सुविधा दिल्या जातात. मालमत्ता कर महानगरपालिकेला सर्व सेवा देण्यासाठी महसूल मिळवून देत असतो. महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत हा मालमत्ता कर असतो, तसेच कायद्यानेही मालमत्ता कर भरणे बंधनकारक आहे. येत्या काळामध्ये महापालिकेने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. विविध विकास कामांमध्ये नऊ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाचे किक्रेट प्रशिक्षण केंद्र, समाज मंदिरे, स्मार्ट व्हिलेज अंतर्गत कोयनावळे, करवले,धानसर, रोडपाली, बौध्दवाडा येथील पायाभूत सुविधांची कामे आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जलदगतीने पूर्ण होत आहेत.
प्रस्तावित कामांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये नागरीकांच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी 450 खाटांचे सुसज्ज माता व बाल संगोपन रुग्णालय हिरकणी या नावाने प्रस्तावित करण्यात आलेले आहे. नवीन मुख्यालय बांधणे, एलईडी पथदिवे बसविणे, तळोजे, पाचनंद येथील तलाव परिसराचे सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुद्देशिय सभागृह बांधण्यात येणार आहे. या सर्व प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर हा प्रमुख स्त्रोत असणार आहे, तसेच न्यायालयानेही मालमत्ता कर वसुलीला स्थगिती दिली नाही. त्यामुळे नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरुन महापालिकेच्या विकासाचे भागीदार बनण्याचे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.
मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी ‘पीएमसी टॅक्स अ‍ॅप’ विकसित केले आहे, तसेच ुुु.रिर्पींशश्राल.ेीस या वेबसाईटवर जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply