आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
खारघर ः रामप्रहर वृत्त
खारघरमधील नागरिकांच्या सेवेसाठी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक रामजी बेरा यांनी भारतीय जनता पक्ष जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 31) करण्यात आले. या वेळी त्यांनी हे जनसंपर्क कार्यालय नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त केला. पनवेल महापालिकेचे माजी नगसरेवक रामजी बेरा यांनी खारघरमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून भाजप जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमास भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, माजी नगरसेवक हरेश केणी, प्रवीण पाटील, शत्रृघ्न काकडे, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, भाजप खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, किर्ती नवघरे, अमर उपाध्याय, संतोष शर्मा, किरण पाटील, युवा नेते समीर कदम, दिलीप जाधव, अनिल साबणे, अजय माळी, साधना पवार, गीता चौधरी, मोना आडवाणी, बिना गोगरी, संध्या शारबिद्रे, शैलेंद्र त्रिपाठी, जी. एन. गुप्ता यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, रामजी बेरा यांनी सुरू केलेले हे जनसंपर्क कार्यालय येणार्या काळात नागरिकांची समस्या सोडविण्याचे केंद्र बनेल. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांनी 13 ते 15 ऑगस्टदरम्यान तिरंगा ध्वज फडकावून देशाच्या उत्सवात उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.