Breaking News

भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी के. के. म्हात्रे यांची नियुक्ती

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पार्टीच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी के. के. म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील नियुक्ती पत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 3) प्रदान करण्यात आले.या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, प्रभाग समिती क चे अध्यक्ष गोपीनाथ भगत, प्रभाग समिती ड चे अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, विकास घरत, प्रभाग क्रमांक 20 अध्यक्ष मनोहर मुंबईकर, सरचिटणीस अमरिश मोकल उपस्थित होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply