Breaking News

वाय. टी. देशमुख यांची ‘रयत’च्या जनरल बॉडी सदस्यपदी नियुक्ती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांची चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आशीवार्दाने रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी देशमुख यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीची बैठक रविवारी (दि. 31) मान्यवरांच्या  पस्थितीत झाली. या वेळी वाय. टी. देशमुख यांची संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. देशमुख यांना पहिल्यापासूनच या संस्थेचे आकर्षण होते. त्यांचे शिक्षणही याच संस्थेतून झाले आहे. त्यामुळे या नामांकित संस्थेत काम करण्याची त्यांची इच्छा होती. ती लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पूर्ण करीत ‘रयत’मध्येही त्यांना सहकारी करून घेतले आहे. या नियुक्तीबद्दल ‘रयत’च्या पदाधिकार्‍यांकडून देशमुख यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply