Breaking News

भाजपचा एकही आमदार फुटणार नाही : आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी

आपल्या पक्षातील डझनभर आमदार फुटणार असल्याची चर्चा भाजपने स्पष्ट शब्दांत फेटाळली आहे. भाजपचा एकही आमदार फुटणार नाही. महाविकास आघाडीच्या आमदारांतच अस्वस्थता असून ते बंडाच्या तयारीत आहेत. त्यातून अशा अफवा पसरवल्या जात असून या चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा पलटवार भाजपचे आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केला.

भाजपचे डझनभर आमदार, एक खासदार पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या घरी नुकत्याच झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीमुळे यात भर पडली. त्यावर अ‍ॅड. आशिष शेलार यांनी तत्काळ खुलासा केला.  तिघाडीच्या नेत्यांकडून अशा अफवा पसरवण्यात येत आहेत. भाजपचे आमदार पक्षशिस्त पाळणारे आहेत. या आमदारांवर विश्वास असल्याने ’तिघाडी’च्या आमदारांप्रमाणे त्यांना डांबून ठेवावे लागले नाही. सर्व 105 आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहेत. अनेक लोककल्याणकारी प्रकल्प बंद करून विनाशाचे काम करणार्‍या या सरकारला लोकांच्या प्रश्नांवर ते सळो की पळो करून सोडतील,’ असा इशाराही शेलार यांनी दिला.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply