Breaking News

राष्ट्रकुल स्पर्धा : भारताच्या पी. व्ही. सिंधूने जिंकले सुवर्णपदक

बर्मिंगहॅम : वृत्तसंस्था
ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. तिने कॅनडाच्या मिशेल ली हिला पराभूतकेले. सिंधूच्या या विजयाने भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 19 झाली आहे.
सिंधूला 2014 व 2018मध्ये महिला एकेरीच्या सुवर्णपदकाने सिंधूला हुलकावणी दिली होती, पण 2022मध्ये तिने अखेर पहिले सुवर्णपदक जिंकले. सायना नेहवालने 2010 व 2018मध्ये महिला एकेरीचे सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर महिला एकेरीत सुवर्ण जिंकणारी सिंधू ही दुसरी भारतीय महिला बॅडमिंटपटू ठरली.
डबल ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धेत 2018मध्ये मिश्र सांघिक गटाचे सुवर्णपदक जिंकले आहे. 2018मध्ये तिला महिला एकेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. 2014मध्ये तिने महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले होते. 2022मध्ये तिला मिश्र सांघिक गटाचे सुवर्णपदक कायम राखता आले नाही आणि रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. यंदा तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply