मुंबई : प्रतिनिधी
पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने (सक्तवसुली संचालनालय) राऊत यांना अटक केली आहे. दरम्यान, आता राऊत यांचा मुक्काम मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असणार आहे.
अटकेनंतर संजय राऊत मागील काही दिवसांपासून ईडी कोठडीत होते. त्यांना सोमवारी (दि. 8) पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर त्यांची पत्नी वर्षा राऊत यांचीही पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने चौकशी सुरू केली आहे.
Check Also
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सात कोटी 11 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ
शेकाप, उबाठाचे कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघात किमानपाच हजार कोटी रुपयांचा निधी …