पनवेल ः रामप्रहर वृत्त
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत नवी मुंबईतील दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या पाचवी इयत्तेतील उद्दोपन बिश्वास या विद्यार्थ्याने सहभाग घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला.
ही स्पर्धा नवी मुंबईतील पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागामार्फत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी 2,200 विद्यार्थ्यांमधून उद्दीपन बिश्वास याने प्रथम क्रमांक पटकाविला. त्याला आयोजकांतर्फे राष्ट्रीय ध्वज, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
या विद्यार्थ्याचे संस्थचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, शाळेच्या मुख्याध्यापिका राज मनोनी यांनी विशेष कौतुक केले.