उरण ः वार्ताहर
उरण तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या करंजा येथील द्रोणागिरी हायस्कूलमध्ये रविवारी (दि. 10) पारंपरिक पद्धतीने नारळीपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. जी. म्हात्रे, सर्व सेवक वर्ग तसेच विद्यालयाचे चेअरमन सिताराम नाखवा व सदस्य उपस्थित होते. सकाळी विद्यालयाच्या प्रांगणात शिक्षक व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सोन्याच्या नारळाच्या प्रतिकृतीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले व नंतर ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर करंजा धक्का याठिकाणी पारंपारिक कोळी नृत्य सादर करण्यात आली. या कार्यक्रमाच्या वेळी विद्यालयाला मदत करणार्या व विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह देण्यात आले व शेवटी नारळाच्या प्रतिकृती सागरला अर्पण करण्यात आली.