Breaking News

आषाढ पौर्णिमेनिमित्त वर्षावास कार्यक्रमास प्रारंभ

पनवेल ः रामप्रहर वत्त

भारतीय बौध्द महासभा, जिल्हा रायगड अंतर्गत तालुका पनवेलच्या वतीने आषाढ पौर्णिमेनिमित्त वर्षावास कार्यक्रमाचा प्रारंभ, कळंबोली येथील आम्रपाली बुद्ध विहार येथे शनिवारी (दि. 24) सायंकाळी संस्थेचे तालुकाध्यक्ष सुनील वाघपंजे यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आला. यावेळी पूजनीय भन्ते धम्म सूर्या यांनी धम्मदेसना दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे तालुका सरचिटणीस राहुल गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णा जाधव, सुरेश गायकवाड, भैयालाल साकेत, विशाल गायकवाड, तसेच कळंबोली विभागातील सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

हा वर्षावासाचा कार्यक्रम पुढील तीन महिने पनवेल तालुक्यातील सर्व बौद्धविहारात महिन्याच्या प्रत्येक रविवारी, गुरुवारी व पौर्णिमेला सायंकाळी घेण्यात येणार असून बौद्ध धम्मातील अनेक घटना आणि विचार तत्त्वांवरील विषयात निष्णांत अभ्यासू, विचारवंत, प्रसिद्ध प्रवचनकार व भन्ते यांच्या प्रवचनाचे व धम्मदेसनेचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा रायगड अंतर्गत तालुका पनवेलच्या सर्व विभागातील शाखांनी चांगल्याप्रकारे केलेले आहे. या कार्यक्रमाला पनवेलकर उपासक, उपासिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply