उरण : वार्ताहर
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत उरण नगर परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि. 13) नगर परिषदेच्या श्री. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळेत गाथा स्वातंत्र्याची हा देश भक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला. या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष माळी, प्रशासकीय अधिकारी अनिल जगधनी, प्रणाली संतोष माळी, भाजप उरण तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहराध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेविका जानव्ही पंडीत, नगरसेवक राजेश ठाकूर, लेखा अधिकारी सुरेश पोसतांडेल, कर अधीक्षक संजय डापसे, कनिष्ठ अभियंता झुंबर माने, आरोग्य निरीक्षक हरेश तेजी, संजय पवार, सचिन नांदगावकर, प्रसाद मांडेलकर, नितेश पंडीत, महिला वर्ग, विद्यार्थी, पालक वर्ग, शिक्षक वर्ग, महिला बचत गट सदस्या व अध्यक्षा आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नितेश पंडीत यांनी केले. रविवारी (दि. 14) चित्रकला, निबंध, वत्कृत्व आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यात मुलांनी उत्कृष्ट चित्र काढून देशावरील प्रेम दाखविले.