Breaking News

लिमये वाचनालयातर्फे राष्ट्रध्वजाला मानवंदना

पनवेल : रामप्रहर वृत्त

के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयात सोमवारी (दि. 15) 75वा अमृतमहोत्सवानिमित्त पनवेलचे सुप्रसिद्ध कवी, गझलकार, लेखक  ए. के. शेख यांच्या हस्ते झेंडावंदन करण्;यात येऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना देणेत आली.

या कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी, लेखक, संपादक रोहिदास पोटे माजी शिक्षण अधिकारी हे उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष श्याम वालावलकर, कार्याध्यक्ष विनायक वत्सराज, कार्यवाह काशिनाथ जाधव, सह कार्यवाह जयश्री शेट्ये, प्रशांत राजे, अ‍ॅड. माधुरी थळकर, हिमालिनी कुलकर्णी, सुनील खेडेकर, रमेश चव्हाण, श्रुती वीरकर, राजेंद्र शेट्ये, धनसे शाहीद सौ. राजे, स्मिता पाटील ग्रंथपाल सो. निकेता शिंदे, शारदा कदम, स्नेहल चौगुले, संजय दिवटे आदी उपस्थित होते.

या वेळी ए. के. शेख यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंतच्या सुवर्णमयी आठवणींना उजाळा देऊन स्वरचित उत्साहपर राष्टगौरव गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply