Breaking News

कोंकण भवनात समूह राष्ट्रगीत गायन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येणार्‍या स्वराज्य महोत्सव या उपक्रमांतर्गत बुधवारी (दि. 17) कोकण भवनात उप आयुक्त मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले.

या वेळी उपआयुक्त (महसूल) मकरंद देशमूख, उपायुक्त (पुरवठा) रवि पाटील, उपायुक्त (रोहयो) वैशाली राज चव्हाण (निर्धार), उपायुक्त (करमणूक) सोनाली मुळे, उपआयुक्त (वस्तू व सेवा कर) कमलेश नागरे, कोंकण विभाग नगररचनाचे सहसंचालक जितेंद्र भोपळे, कोंकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश धुमाळ तसेच विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शासन निर्णयात दिलेल्या सूचनेनूसार कोंकण भवन इमारतीत असलेल्या सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी कोकण भवन इमारतीच्या प्रांगणातील ध्वजस्तंभाजवळ उपस्थित राहून समूह राष्ट्रगीत गायन केले.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply