माणगाव : माणगाव -पुणे रस्त्यावरील ताम्हिणी घाटात कारला भिषण अपघात होऊन कार 200 फूट खाली दरीत कोसळली. या अपघातात कारमधील तीन जण जागीच ठार झाले असून तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी (दि. 20) सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडला. अकोला जिल्ह्यातील वाशीम येथून आलेल्या स्विफ्ट कारमध्ये एकूण सहा प्रवासी होते. ताम्हिणी घाटात आले असताना वळणावर त्यांची कार कठडा तोडून 200 फूट खाली दरीत कोसळली. या अपघाटाची माहिती समजताच, माणगाव पोलिसांसह साळुंखे रेस्क्यू टिम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अपघातात कारचा चुराडा झाला. कारमधील ऋषभ चव्हाण, सौरभ भिंगे, क्रिष्णा राठोड यांचा जागीच मृत्यू झाला, तर रोहन गाडे, प्रवीण सरकटे, रोशन चव्हाण हे जखमी झाले.
Check Also
पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …
RamPrahar – The Panvel Daily Paper