पनवेल : भारतीय जनता पक्ष सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील यांचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी राजेश पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी जिल्हा प्रवक्ते वाय.टी. देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, भाजप नेते के. के. म्हात्रे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष महेश पाटील, वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष शेळके, माजी उपसरपंच सतीश मालुसरे, पाली देवद युवा मोर्चा सरचिटणीस महेश केणी आदी उपस्थित होते.