Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रस्ता विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : प्रतिनिधी
गव्हाण फाटा ते गव्हाणच्या दिशेने जाणारा रस्ता सिडकोने विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नविकासाकरीता उलवे नोड पॅकेज तीन विकसित करताना उद्ध्वस्त केला होता. हा रस्ता गव्हाण, शेलघर, न्हावा, न्हावाखाडी, कोपर, शिवाजीनगर या गावातील नागरीकांचा रहदारीचा तो बंद झाल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत होता. यासंदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला असून अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यानुसार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या रस्त्याचे शनिवारी (दि. 20) भूमिपूजन झाले. या वेळी त्यांनी पनवेल, उरण नवी मुंबई या ठिकाणी जाण्याकरीता हा रस्ता महत्त्वाचा असून लवकरात लवकर या रस्त्याचे काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सिडकोमार्फत नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनकरिता उलवे नोड पॅकेज-3 विकसित करताना जिल्हा परिषदेचा 70 वर्षे जुना तसेच गव्हाण, जावळे, शेलघर, न्हावा, न्हावाखाडी, कोपर, शिवाजीनगर ग्रामस्थांच्या रहदारीचा रस्ता उध्वस्त केला होता. आम्रमार्गाच्या रचनेनुसार सर्व ग्रामस्थांना उलवे नोडमधूनच जावे लागत होते, मात्र हा गव्हाण फाटा ते गव्हाण हा रस्ता पुन्हा सुरू व्हावा, अशी ग्रामस्थांची मागणी होती. त्यानुसार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.  या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले.
या सोहळ्याला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य रवींद्र पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, वहाळ येथील साईमंदिर संस्थानचे अध्यक्ष रविशेठ पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, सिडको अधीक्षक अभियंता श्री. गोसावी, श्री. फडके, गव्हाण ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन घरत, योगिता भगत, प्रमोद कडू, रमेश घरत, रामदास नाईक, अश्विन नाईक, सचिन घरत, हेमंत पाटील, ठेकेदार पी. डी. देशमुख यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, सिडकोच्या माध्यमातून विकास होत असताना गावकर्‍यांच्या समस्या डावलून चालणार नाही. त्यामुळे सिडकोने ग्रामस्थांच्या समस्या सोडवाव्यात अशा सूचना दिल्या, तसेच राज्यात सत्तांतर झाले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वेगाने विकासकामे होत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे कामही लवकरात लवकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करीत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply