Breaking News

ठाणा नाका रस्त्याची स्वच्छता

नगरसेवक विक्रांत पाटील यांची तप्तरता

पनवेल : वार्ताहर

ठाणा नाका रोड येथे असलेल्या पोलीस गुन्हे शाखा युनिट 2च्या परिसरातील बरीच छोटी मोठी झाडे झुडपे वाढली होती, झाडांचा पालापाचोळा व इतर कचरा सतत पडत असल्यामुळे आजूबाजूच्या रहिवासी क्षेत्राला डास आणि अस्वच्छता याचा त्रास होऊ लागला होता. त्याबद्दलची अडचण काही नागरिकांनी प्रभागाचे कार्यक्षम नगरसेवक तथा माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्याकडे सांगितली. विक्रांत पाटील यांनी त्वरित कार्यवाही करत तातडीने संबंधित रस्त्याची साफसफाई करून घेतली.

माझा प्रभाग, माझी जवाबदारी या अनुषंगाने काम करणारे व प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर राहणारे नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केलेल्या कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या वेळी विक्रांत पाटील यांनी प्रभागातील नागरिकांना आवाहन केले आहे की, नागरिकांनी आपल्या कोणत्याही समस्या अथवा सूचना यासाठी केव्हाही हक्काने 9167042666 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी त्वरित प्रयत्न केले जातील.

नवीन पनवेलमध्ये फुटपाथच्या कामाला सुरुवात

पनवेल : वार्ताहर

नवीन पनवेल येथील सेक्टर 2 आणि 3 मधील नागरिकांनी फुटपाथरच्या होत असलेल्या दुर्दशेबद्दल नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडे समस्या मांडली होती. त्यानुसार पाटील यांनी या विषयाची गंभीर दखल घेत सिडकोच्या अधिकार्‍यांना फुटपाथ बनवण्यासाठी पत्र दिले. तसेच सतत पाठपुरावा करून फुटपाथ बनवण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून घेतली.

माझा प्रभाग माझी जवाबदारी या अनुषंगाने काम करणारे नगरसेवक विक्रांत पाटील हे आपल्या प्रभाग 18 मधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्परता दाखवत असतात. आरोग्य, साफसफाई, पाणीपुरवठा, लाइटचा विषय असो की रस्ते आणि फुटपाथ बांधणे विषय असो, जोपर्यंत समस्येचे निरसन होत नाही तोपर्यंत पाठपुरावा करत राहतात. त्याचाच प्रत्यय यानिमित्ताने पुन्हा आला आहे. नवीन पनवेल सेक्टर 2 आणि 3 मधील नागरिकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply