Breaking News

नवी मुंबईत विसर्जनासाठी 135 कृत्रिम तलाव

महापालिकेचे नियोजन; नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना यंदा परवानगी दिल्याने या वर्षी या मूर्त्यांची संख्या 50 टक्केपर्यंत असणार आहे. यामुळे पालिका प्रशासनाने या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांवर नियोजन केले असून शहरात 135 असे तलावांचे नियोजन केले जाणार आहे.

मागील दोन वर्षांत करोनामुळे शहरात गणेशोत्सव साधेपणाने निर्बंध घालून साजरा करण्यात आला होता. त्यामुळे यावेळी पालिका प्रशासनाने शहरात कृत्रिम तलावांचे नियोजन केले होते. जास्तीत जास्त गणेश मूर्तींचे या ठिकाणी विसजर्न करण्यात आले होते. आता निर्बंधमुक्त गणेशोत्सव होत असून शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींनाही परवानगी दिली आहे. त्यामुळे या मूर्तींची संख्या या वर्षी वाढणार आहे. या मूर्ती सार्वजनिक विसर्जन तलावात विसर्जित केल्या तर पर्यावरणचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने मूर्ती विसर्जनासाठी सार्वजनिक तलाव व कृत्रिम तलावांचे नियोजन केले आहे. शहरात पारंपरिक 22 विसर्जन तलाव आहेत. तसेच 134 कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. कृत्रिम तलावांत फक्त फ्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विसर्जन करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी 151 कृत्रिम विसर्जन स्थळांची निर्मिती करण्यात आली होती. यात वाढ करीत यावर्षी 134 कृत्रिम तलाव निर्मिती करण्यात येणार आहेत.

पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच

शासनाच्या वतीने यंदा पीओपी गणेश मूर्तींना परवानगी दिली आहे. मात्र जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्ती असाव्यात असे सूचित करण्यात आलेले आहे. त्यामुळे यंदा ही 50 ते 40 टक्के गणेश मूर्ती पीओपीच्या असणार आहेत. त्यामुळे पर्यावरण पूरक गणेशमूर्तींचे सार्वजनिक स्थळावर विसर्जन करता येईल, परंतु पीओपी मूर्ती मात्र कृत्रिम तलावांवरच विसर्जन करण्यात येईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

विसर्जन तलावांचे विभागानुसार नियोजन

बेलापूर पाच सार्वजनिक तलाव, 16 कृत्रिम तलाव, नेरूळ दोन सार्वजनिक तलाव, 25 कृत्रिम तलाव, तुर्भे तीन सार्वजनिक तलाव, 20 कृत्रिम तलाव, वाशी दोन, 16 कृत्रिम तलाव, कोपरखैरणे दोन सार्वजनिक तलाव, 14 कृत्रिम तलाव, घणसोली चार सार्वजनिक तलाव, 18 कृत्रिम तलाव, ऐरोली तीन सार्वजनिक तलाव, 16 कृत्रिम तलाव, दिघा दोन सार्वजनिक तलाव, नऊ कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply