Breaking News

आजिवली शाळेत संगणक, वह्यावाटप

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची बांधिलकी

पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरजू विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करण्यात येते. त्या अंतर्गत मंडळाच्या वतीने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आजिवली येथील हायस्कूलमध्ये मंगळवारी (दि. 23) शैक्षणिक साहित्य आणि संगणक देण्यात आले. भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमाला स्कूल कमिटी चेअरमन तथा भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जितेंद्र घरत, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, किसान पाटील, सुभाष पाटील, रामदास खेत्री, नामदेव पाटील, सतीश पाटील, बबन पवार, भारत पाटील, अनिता पवार, दिनेश पाटील, सुनील पाटील, संदेश पाटील, किशोर सुरते, प्रमोद भिंगारकर, योगेश लहाने आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आजिवली येथील हायस्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे पाच संगणक व टेबल आणि एक प्रिंटर देण्यात आला आहे. याबद्दल शाळेकडून मंडळाचे आभार मानण्यात आले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply