Breaking News

गव्हाण कोपर येथे नवीन व्यवसाय सुरू

भाजप नेत्या रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील गव्हाण कोपर येथे दाद्या इन्टरप्रायजेसच्या नावाने सुजाता पाटील यांनी नवीन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या नवीन व्यवसायाचे भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 27) उद्घाटन झाले. या वेळी रत्नप्रभा घरत यांनी सुजाता पाटील यांना व्यवसायाच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

गव्हाण कोपर येथे भाजपच्या उलवे नोड 2च्या उपाध्यक्षा सुजाता राजेश पाटील दाद्या इंटरप्रायझेस हा पत्रावळी, द्रोन, डिश, ग्लास हे होलसेल दरात उपलब्ध करून देण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या या व्यवसायाचे महिला मोर्चा तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते उद्घाटने झाले. या वेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, रामदास ठाकूर, कोपर गाव अध्यक्ष सुधीर ठाकूर, मोरू नारायण स्कूलचे चेअरमन भार्गव ठाकूर, उलवे नोड उपाध्यक्ष अनंता ठाकूर, भाऊ भोईर, कमलाकर घरत, कमलाकर देशमुख, नामदेव घरत, नंदाताई ठाकूर, आशिष घरत, साईचरण म्हात्रे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply