पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज न्यू पनवेल (स्वायत्त) येथे बायोडायवरसिटी सेल (इळेवर्ळींशीीळीूं लशश्रश्र)चे उदघाटन व बायोडायवरसिटी कन्सर्वेशन (इळेवर्ळींशीीळीूं उेपीर्शीींरींळेप)वर अतिथी व्याख्यान शनिवारी (दि. 27) आयोजित केले होते.
या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे सहाय्यक प्राध्यापक, प्राणीशास्त्र विभाग ए. सी. एस. कॉलेज, डॉ. दिग्विजय लवटे उपस्थित होते. या व्याखानासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. एस. के. पाटील, विज्ञान शाखेच्या प्रमुख डॉ. जे. एस. ठाकूर, प्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. मंदा म्हात्रे, रुसा समन्वयक डॉ. शैलेश वाजेकर यांनी उपस्थिती दर्शविली तसेच विभागाचे सर्व शिक्षक कर्मचारी व 101 विद्यार्थी उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी महाविद्यालयाच्या कीर्तीचा मागोवा घेतला. प्रस्तावना प्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. मंदा म्हात्रे यांनी केली. तसेच बायोडायवरसिटी सेल सुरू करण्यामागचा उद्देश सांगितल. प्रमुख पाहुणे डॉ. दिग्विजय लवटे यांनी पश्चिम घाटातील उपलब्ध असणार्या प्राण्यांची माहिती दिली तसेच जंगलातील प्राण्यांचे संवर्धन करणे खूप गरजेचे आहे हे उपस्थितांना पटवून सांगितले.
सूत्रसंचालन प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. लैकुर रहमान खान तसेच प्रा. डॉ. योजना मुनीव यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर व संस्थेचे सचिवडॉ. एस. टी. गडदे, प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी आयोजकांचे कौतुक केले.