Breaking News

भाजपतर्फे ‘सेवा पंधरवडा’ चे आयोजन 

पनवेल : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्यावतीने विविध सेवाकार्य असलेल्या ‘सेवा पंधरवडा’चे आयोजन करण्यात आले असून देशभर चालणाऱ्या या उपक्रमात रायगड जिल्ह्याचा वाटा महत्वाचा असेल, असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव तसेच महिला मोर्च्याच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज(दि. ११) येथे केले. सेवा पंधरवडा अनुषंगाने उत्तर व दक्षिण रायगड जिल्ह्याची नियोजन बैठक विजया रहाटकर यांच्या मार्गदशनाखाली आणि आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पार पडली. या बैठकीस भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग घेऊन संवाद साधला.   या बैठकीस भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, माजी महापौर कविता चौतमोल, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, श्रीनंद पटवर्धन, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा आश्विनी पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के. के. म्हात्रे, प्रल्हाद केणी, सुनिल घरत, निळकंठ घरत, सतीश धारप, रमेश मुंढे, दीपक बेहेरे, वैकुंठ पाटील, मिलिंद पाटील, राजेश मपारा, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा,  कर्जत तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, खालापूर तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे, खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, महिला मोर्चा पनवेल तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.  विजया रहाटकर यांनी या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल मार्गदर्शन करताना सांगितले कि, देशाला जगात ताकदवान बनविण्याचे काम करणारे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी वचनबद्ध आहे. ते अंत्योदयाचा संकल्प देत देशातील गोर-गरीब, शोषित व वंचित वर्गाच्या कल्याणाकरिता देशसेवेचे ध्येय साध्य करत विविध जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी समर्पित भावनेने कार्यरत असतात. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्यावतीने दिनांक १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर पर्यंत ‘सेवात्मक’, ‘रचनात्मक’, ‘व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व’ अशा विविध सेवाकार्य असलेल्या ‘सेवा पंधरवडा’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यांनी पुढे सांगितले कि, या पंधरवडा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील प्रदर्शनी, मोदी @२० बुकचे स्टॉल, जकल्याणकारी कामाबद्दल धन्यवाद पत्र, रक्तदान शिबिरे,  आरोग्य शिबीरे व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण, बुद्धिजीवी संमेलन, दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव वितरण व वयोश्री योजनेचे कॅम्प, २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त भारत करण्यासाठी रुग्णांना दत्तक घेत त्यांचे उपचार व काळजी घेण्यासंदर्भात मोहीम, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संदेश देणारे मेळावे, जिल्हयातील स्थानिक उत्पादने व व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘व्होकल फॉर लोकल’, २५ सप्टेंबरला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती असून प्रत्येक बुथवर जयंती साजरी करणे तसेच त्या दिवशी महिन्यातील शेवटचा रविवार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन कि बात’ कार्यक्रम होणार आहे, त्याचे प्रत्येक बुथवर प्रक्षेपण करून विचारांचा लाभ घ्यावा, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य केंद्र परिसर, उद्यान, शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबविणे, तसेच त्याचदिवशी माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांचीही जयंती असून त्या संदर्भातही कार्यक्रम राबविणे, अमृत सरोवर अंतर्गत तालुक्यातील तलाव स्वच्छ करणे व प्लॅस्टिक मुक्ती जनजागृती, ‘जल हि जीवन’ मंत्र घेऊन जनजागृती रॅली, प्रत्येक शक्तीकेंद्रावर वृक्षारोपण, तसेच खादी उपक्रमांतर्गत प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यानी खादीच्या वस्तू खरेदी करणे असे विविध कार्यक्रमे या सेवा पंधरवड्यात असल्याचे त्यांनी सांगत मार्गदर्शक सूचना केल्या. आणि हा पंधरवडा जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा यशस्वी करेल असा, विश्वासही विजया रहाटकर यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार महेश बालदी यांनी, रायगड जिल्हा भाजपच्यावतीने वर्षभर सातत्याने सेवा उपक्रम आयोजित करून त्याचा लाभ सर्वांना मिळवून देत असल्याचे सांगतानाच सदरचे सेवा पंधरवडा मागील प्रमाणे यावेळीही यशस्वी करण्यासाठी नियोजनबद्ध आयोजन करणार असल्याचे सांगितले.  या बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक बेहेरे यांनी मानले.
महाराष्ट्र प्रदेश भाजपची कार्यकारिणी बैठक दोन महिन्यापूर्वी पनवेलमध्ये संपन्न झाली. अत्यंत सुंदर आणि शिस्तबद्ध नियोजन या बैठकीचे होते. या बैठकीच्या नियोजबद्दल संपूर्ण राज्यात वाहवा झाली. अभिमानास्पद आयोजनाबद्दल मी आमदार प्रशांत ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांचे या बैठकीतून आभार आणि कौतुक करते.
– विजया रहाटकर 

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply