भोपाळ : वृत्तसंस्था
भारतातून नामशेष झालेल्या चित्त्याचे तब्बल 75 वर्षांनंतर मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात शनिवारी (दि. 17) आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्त्यांना उद्यानात सोडले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने पाच मादी आणि तीन नर असे एकूण आठ चित्ते विशेष कार्गो विमानाने आफ्रिकेतील नामिबियातून ग्वाल्हेरमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरने कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पंतप्रधानांना त्यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट दिली आहे.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …