Breaking News

‘मविआ’च्या मोर्चात पैसे देऊन ‘भाडोत्री’ कार्यकर्ते;व्हिडीओ व्हायरल

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत महाविकास आघाडीकडून शनिवारी (दि. 17) मोर्चा काढण्यात आला होता. ठाकरे गट शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आघाडीतील मुख्य घटक पक्ष आणि इतर सहकारी पक्षांचा समावेश असलेल्या या मोर्चाला त्या तुलनेत तेवढा प्रतिसाद मिळू शकला नाही. या वेळी गर्दी जमविण्यासाठी पैसे देऊन भाडोत्री कार्यकर्ते आयात करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चात जमलेल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंंटवरून एक व्हिडीओही शेअर केला आहे, ज्यामध्ये काही कार्यकर्ते काँग्रेसचे गमछे गळ्यात घालून पैसे घेताना दिसत आहेत. संबंधित व्हिडीओ मुंबईतील पत्रकार संघानजीक काँग्रेस कार्यालयाजवळील आहे.
याकडे लक्ष वेधत केशव उपाध्ये म्हणाले, यावरून लक्षात येते की मुळात या मोर्चाला प्रतिसाद नव्हता. ओढून ताणून लोक आणली. जी थोडीफार गर्दी जमली ती अशा पद्धतीने पैसे वाटून आणली का, असा आमचा प्रश्न आहे. महाविकास आघाडीबाबत जनतेत विश्वास उरला नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply