Breaking News

ट्विटरवर मोदी मोदी; पाच कोटी फॉलोअर्स

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर फार अ‍ॅक्टिव्ह राहतात. मग ते इन्स्टाग्राम असो, लिंक्डइन असो, यू ट्यूब किंवा ट्विटर असो. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान मोदी यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. नरेंद्र मोदी यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या सोमवारी पाच कोटी झाली आहे. ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्यांच्या यादीत मोदी 20व्या क्रमांकावर आहेत. पहिल्या 20मध्ये पोहचणारे मोदी एकमेव भारतीय आहेत. अमिरेकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मोदी 1.4 कोटी फॉलोअर्सने पिछाडीवर आहेत. अमिरेकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा 10.8

कोटी फॉलोअर्ससह अव्वल स्थानावर आहेत. 2009मध्ये गुजरात राज्याच्या मुख्यमंत्रिपदी असताना नरेंद्र मोदी यांनी ट्विटर अकाऊंट सुरू केले होते. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) अधिकृत ट्विटर अकाऊंटची फॉलोअर्स संख्या तीन कोटी झाली आहे. भारतीय नेत्यांमध्ये मोदी यांच्यानंतर सर्वाधिक फॉलोअर्समध्ये दुसर्‍या स्थानावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दुसर्‍या स्थानावर आहेत. केजरीवाल यांचे ट्विटरवर एक कोटी 54 लाख फॉलोअर्स आहेत. गृहमंत्री अमित शहा तिसर्‍या स्थानावर असून, त्यांचे एक कोटी 52 लाख फॉलोअर्स आहेत. राहुल गांधी या यादीत पाचव्या स्थानावर असून, त्यांचे एक कोटी सहा लाख फॉलोअर्स आहेत. चौथ्या स्थानावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आहेत. त्यांचे एक कोटी 41 लाख फॉलोअर्स आहेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply