Breaking News

जेएनपीएत अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त

एका कंटेनरमध्ये आढळला 3030 किलोंचा साठा

उरण : रामप्रहर वृत्त

जेएनपीए बंदरा सीमाशुल्कच्या विभागाने केलेल्या कारवाईत एका कंटेनर मधून तब्बल 3030 किलो रक्तचंदनाचा साठा शनिवारी   (दि. 17) जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या रक्तचंदनाची किंमत अडीच कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली.

सीमाशुल्क विभागाच्या डीआरआय विभागाच्या अधिकार्यांना एका कंटेनरमध्ये रक्तचंदन असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत विदेशात तारखिळ्यांच्या नावाखाली पाठविण्याच्या तयारीत असलेला एका कंटेनरमध्ये 3030 किलो रक्तचंदनाचा साठा जप्त साठा सापडला असून तो जप्त केला आहे. जेएनपीए बंदर सुरू झाल्यापासून या बंदरातून तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. यापूर्वी रक्तचंदन व इतर तस्करीच्या अनेक घटना घडून त्यांच्यावर कारवाई ही करण्यात आल्या आहेत. या वेळी काही तस्करांच्या साथीदारांना अटकही करण्यात आलेली आहे, मात्र रक्तचंदन व इतर तस्करी करणार्‍या तस्करांच्या मुळापर्यंत जाऊन कारवाई करण्यात यश येताना दिसत नाही.

जेएनपीए बंदरातुन तस्करीच्या मार्गाने रक्तचंदनाचा साठा विदेशात पाठविण्याच्या तयारीत असलेल्याची माहिती जेएनपीटी सीमाशुल्क विभागाच्या डीआरआय विभागाच्या अधिकार्‍यांच्या हाती लागली होती. डीआरआय विभागाच्या अधिकार्‍यांनी ताबडतोब कारवाईला सुरुवात करून बंदरातील संशयित कंटेनरचा शोध घेऊन कारवाई सुरू केली. या वेळी विदेशात पाठविण्याच्या तयारीत असलेला एका कंटेनरमधून 3030 किलो रक्तचंदनाचा साठा सापडला. कंटेनरमध्ये तीन पार्सलमध्ये हा रक्तचंदनाचा साठा लपवून ठेवला होता. तारखिळ्याच्या बनावट नावाखाली हा रक्तचंदनाचा साठा विदेशात पाठविण्यात येणार होता, मात्र डीआरआय विभागाच्या अधिकार्यांनी वेळीच कारवाई केल्यामुळे चंदन तस्करांचा डाव फसला आहे.

जेएनपीए बंदर सुरू झाल्यापासून तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. यापूर्वी रक्तचंदन व इतर तस्करीच्या घटना घडून त्यांच्यावर कारवाई ही करण्यात आल्या आहेत. या वेळी काही तस्करांच्या साथीदारांना अटकही करण्यात आलेली आहे, मात्र रक्तचंदन व इतर तस्करी करणार्‍या तस्करांच्या मुलापर्यंत जाऊन कारवाई करण्यात यश येताना दिसत नाही.

Check Also

तळोजा मजकूरमध्ये शिवरायांच्या मंदिराचा वर्धापन दिन

तळोजा : रामप्रहर वृत्ततळोजा मजकूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा पहिला वर्धापन दिन रविवारी …

Leave a Reply